शिवाजी पार्क आंदोलन प्रकरणी आदित्य आणि अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क येथे झालेल्या आंदोलनाप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अमित ठाकरे यांच्याविरोधात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.

काल शिवाजी पार्कमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. या कारवाईवर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी आक्षेप घेतला. यानंतर हे दोन्ही नेते स्वत: आंदोलनात उतरले. या घडामोडींनंतर पोलिसांनी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी रविवारी (11 ऑक्टोबर) शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करण्यात आले. मात्र, निदर्शनास परवानगी न मिळाल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. आदित्य आणि अमित ठाकरे यांच्यावर बेकायदेशीरपणे एकत्र येणे, सरकारी कामात अडथळा आणणे आणि परवानगीशिवाय आंदोलन करणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकरे बंधूंसोबत उपस्थित सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा-

काँग्रेसचा संविधानावर विश्वास नाही!

Comments are closed.