सातव्या मजल्यावरून पडून मुलाचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

१७ वर्षीय मुलाचा एका इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना भाईंदर पूर्व येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मुलाच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

भाईंदर पूर्व येथील दीपक हॉस्पिटल रोडवरील मेडतिया रविराज कॉम्प्लेक्समध्ये हा मुलगा आपल्या कुटुंबियांसह राहत होता. १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ४.२० वाजण्याच्या सुमारास तो इमारतीच्या सातव्या मजल्यावरून खाली पडला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने भाईंदर पूर्व येथील महालक्ष्मी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात हलवण्यात आले. येथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. दरम्यान याप्रकणी नवघर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलगा खाली कसा पडला याबाबतचा तपास नवघर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार रवींद्र घोरपडे करत आहेत.

Comments are closed.