ऑक्टोबर हीटमध्ये अशी घ्यावी आरोग्याच्या काळजी
ऑक्टोबर महिन्यात पाऊस कमी झाल्यानंतर वातावरणात उष्णता आणि दमटपणा वाढतो. त्यामुळे जास्त घाम येणे, थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे, ॲसिडिटी आणि डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी शरीर थंड ठेवणे, पुरेसे पाणी पिणे आणि हलका, पौष्टिक आहार घेणे महत्त्वाचे आहे. अन्यथा या दिवसात उष्माघात होऊ शकतो. त्यासाठी आहारात काय खावं आणि काय काळजी घ्यावी ते बघूया.
आरोग्याची काळजी
आपण तहान लागल्यानंतरच पाणी पितो. पण या दिवसात तहान लागण्याची वाट न पाहता पुरेसे पाणी प्यावे.
घराबाहेर जाताना पाण्याची बाटली नेहमी सोबत ठेवावी.
भरपूर घाम आल्यास लिंबूपाणी, ताक किंवा योग्य प्रमाणात ORS घ्यावे.
उन्हात बाहेर जाणे टाळावे
नेहमीच्या उन्हाळ्यापेक्षा ऑक्टोबर हीटची तीव्रता वेगळी असते. त्यामुळे दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो कडक उन्हात जाणे टाळावे.
उन्हाळ्यात हलके, सैल आणि सुती कपडे वापरावे.
बाहेर जाताना छत्री, टोपी आणि सनस्क्रीन वापरावे.
विश्रांती आणि झोप
ऑक्टोबर हीटच्या काळात पुरेशी झोप घ्यावी आणि अतिश्रम टाळावे.
जर तुम्ही व्यायाम करत असाल तर सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावा.
शरीर खूप गरम होत असल्यास थंड जागी विश्रांती घ्यावी.
Comments are closed.