रत्नागिरी येथे भारतीय हिंदुस्थानी एएलएच एमके-३ हेलिकॉप्टरचा समावेश

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानी तटरक्षक दलाने आज रत्नागिरीतील तटरक्षक क्षेत्रात स्वदेशी प्रगत हेलिकॉप्टर (अॅडव्हान्स्ड लाईट हेलिकॉप्टर – एमके -III) समाविष्ट केले. रत्नागिरी येथील तटरक्षक दलाच्या एअर स्टेशन वर पारंपारिक ‘वॉटर कॅनन सॅल्युट’ देऊन या हेलिकॉप्टरचे स्वागत करण्यात आले. हिंदुस्थानी तटरक्षक वायू अवस्थान रत्नागिरीच्या कमांडिंग ऑफिसरनी विमान आणि क्रू सदस्यांचे स्वागत केले.

रत्नागिरीत एएलएच एमके-३ चा समावेश झाल्याने पश्चिम किनारपट्टीवरील हिंदुस्थानी तटरक्षक दलाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे. हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर प्रगत रडारने सुसज्ज असून, त्यात इलेक्ट्रो-ऑप्टिकल पॉड आणि ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीमद्वारे लांब पल्ल्याच्या इमेजिंग आणि ओळखण्याच्या क्षमतेचा समावेश आहे. याशिवाय, लक्ष्याला निष्प्रभ करण्यासाठी विमानाच्या केबिनमध्ये १२.७ मिमी हेवी मशीन गन बसवण्यात आली आहे. या वाढीव पाळत ठेवणे, शोधणे, ओळखणे आणि प्रतिसाद देण्याच्या क्षमतेमुळे विशेषतः महाराष्ट्राच्या संवेदनशील किनारपट्टीवर, ईईझेड मधील राष्ट्राच्या सागरी हितसंबंधांचे रक्षण करण्याची भारतीय तटरक्षक दलाची क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल.

Comments are closed.