नई नवेलीच्या रीलीजपुर्वी यामी गैतम अयोध्येत दाखल, भगवान रामाचे घेतले दर्शन – Tezzbuzz

यामी गौतम सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. तिला नुकताच 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘आर्टिकल ३७०’ मधील भूमिकेसाठी या अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मिळाला होता. आणि त्यानंतर ती आता तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. हा चित्रपट म्हणजे ‘नई नवेली’. हा एक हाॅरर काॅमेडी चित्रपट असुन हा 16 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. तर या चित्रपटाच्या रिलीज पुर्वीच यामीने उत्तर प्रदेशातील राम मंदिराला भेट दिली, आणि भगवान श्री रामाचे दर्शन आणि आर्शीवाद घेतले.

अभिनेत्री यामी (yami)गौतमने राम मंदिरातील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती पिवळी साडी नेसुन रामलल्लासमोर नतमस्तक होताना दिसत आहे. एका मध्ये ती मंदिराच्या आवारात होत जोडुन बसलेली दिसत आहे. राम मंदिराच्या परिसरात थोडा वेळ थांबुन तिने हनुमंगढीलाही भेट दिली, आणि तिथे तिने हनुमान चालिसाचे पठण केले.

अभिनेत्री यामीने हे फोटो शेअर करताना यामी गौतमने कॅप्शनमध्ये लिहिले, “अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरात दिव्य दर्शन झाल्याने मी स्वतःला धन्य समजते. त्या गहन आणि भावनिक भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतील. जय श्री राम, जय हनुमान.

नई नवेली बाबत बोलायचे झाल्यास हा एक फँटसी आणि हॅारर कॅमेडी चित्रपट आहे. 16 ऑक्टोबर रोजी म्हणजेच उद्या हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. यामध्ये यामी गौतम मोहीनी च्या भुमिकेत दिसणार असुन तिच्यासोबत आदिनाथ कोठारे आणि मीता वशिष्ठ यांच्यासारखे कलाकार दिग्गज कलाकार मुख्य भुमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा

; हा प्रसिद्ध अभिनेता देणार जटायू पात्राला आवाज

Comments are closed.