Ratnagiri News – 11 लाख 37 हजारांचा चुना लावणाऱ्या सायबर भामट्याच्या मुसक्या आवळल्या
आयपीओ आणि ओटीसी ट्रेंडीगद्वारे अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून पती-पत्नीची तब्बल 11 लाख 37 हजार 14 रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्यांच्या रत्नागिरी पोलिसांनी धाराशिव येथून मुसक्या आवळल्या आहेत.
व्हॉटस्ॲपद्वारे संपर्क करून सायबर भामट्याने फिर्यादी यांच्याकडून विविध बॅंकामधून पैसे जमा करून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पती आणि पत्नीने रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तांत्रिक विश्लेषण, बॅंक व्यवहाराचा मागोवा आणि स्थानिक बातमीदारांच्या माध्यमातून आरोपी दादासाहेब चौघुले आणि तुषार चौधरी हे धाराशिव येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी स्मिता सुतार, सहायक निरीक्षक तुषार जाधव, हवालदार संदीप नाईक, सौरभ कदम आणि आदर्श इंगवले यांनी केली आहे.
Comments are closed.