बीसीसीआयने भाकरी फिरवली; वेस्ट इंडिज विरुद्धच्या निर्णायक सामन्यापूर्वी भुवनेश्वर कुमारला बोलावलं
IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर झाला आहे. त्यामुळे निर्णायक सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या गोलंदाजीसमोर आव्हान उभे राहिले आहे.
या सोबतच सुखद बातमी देखील समोेर आली आहे. अर्शदीपच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा संघात समावेश करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भुवनेश्वरला पुन्हा एकदा भारतीय जर्सीत खेळण्याची संधी मिळणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेतील शेवटचा सामना महत्त्वाचा असल्याने भुवनेश्वरच्या अनुभवाचा संघाला फायदा होऊ शकतो.
बातमी अपडेट होत आहे…
Comments are closed.