जनगणनेच्या नियमांमध्ये बदल

खासगी शाळेतील शिक्षकांनाही गणना कर्मचारी होता येणार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

केंद्र सरकारने जनगणनेच्या कामासाठी गणना कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीशी संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने 16 ऑक्टोबर रोजी जनगणना (सुधारणा) नियम, 2026 ची अधिसूचना जारी केली. नव्या नियमानुसार सरकारी तसेच खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षक, विविध सरकारी विभागांमधील लिपिक व अधिकारी आणि राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने योग्य ठरविलेल्या इतर व्यक्तींनाही गणना कर्मचारी म्हणून नियुक्त करता येणार आहे. नियमांमधील या बदलाचा उद्देश जनगणनेच्या कार्यासाठी उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या कक्षेला स्पष्ट करणे आहे. नवे नियम अधिसूचनेनंतर लागू झाले आहेत.

नव्या नियमांमध्ये तीन श्रेणींच्या लोकांना गणना कर्मचारी म्हणून काम करण्यासाठी सामील करण्यात आले आहे. यात सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानप्राप्त किंवा विनाअनुदानित खासगी शिक्षण संस्थांचे शिक्षक, केंद्र आणि राज्य सरकारच्या विभागांसमवेत विविध संस्थांचे लिपिक आणि अधिकारी तसेच राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश प्रशासनाकडून उपयुक्त मानले जाणारे व्यक्ती सामील आहेत.

नियमांमध्ये बदल महत्त्वपूर्ण

जनगणनेदरम्यान लोक अन् परिवारांशी निगडित माहिती जमविण्यासाठी मोठ्या संख्येत गणना कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. नव्या नियमांमध्ये विविध विभाग आणि संस्थांशी जोडलेल्या लोकांना सामील करण्याची तरतूद आहे. यामुळे गणना कर्मचारी म्हणून नियुक्त केले जाऊ शकणाऱ्या लोकांच्या श्रेणी स्पष्ट होतात. शिक्षक स्वत:च्या कामादरम्यान लोकांशी संवाद साधतात, तर सरकारी आणि अन्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांनाही या जबाबदारीसाठी निवडले जाऊ शकते. याचबरोबर राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाला अशा अन्य उपयुक्त लोकांना निवडण्याचा पर्याय देण्यात आला आहे, ज्यांना ते कामासाठी योग्य मानतात. अधिसूचनेत गणना कर्मचाऱ्यांची एकूण संख्या, नियुक्तीची तारीख किंवा त्यांच्या मानधनाविषयी कुठलीच माहिती देण्यात आलेली नाही.

नवे नियम तत्काळ लागू

या नियमांना जनगणना नियम, 2026 म्हटले जाणार असल्याचे अधिसूचनेच्या पहिल्या तरतुदीत नमूद आहे. दुसऱ्या तरतुदीनुसार हे नियम गॅझेटमध्ये प्रकाशित होण्याच्या तारखेपासून प्रभावी होतील. अधिसूचनेवर 16 ऑक्टोबर 2026 ही तारीख नेंद आहे. यात जनगणना नियम, 1990 मध्ये बदल करत क्रम संख्या 5 अंतर्गत लोकांच्या पात्रतेशी निगडित नव्या तरतुदींचा उल्लेख करण्यात आला आहे. अधिसूचना भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांच्या नावाने जारी करण्यात आली आहे. यापूर्वीचे नियम आणि त्यात 1994, 2009, 2018 आणि 2022 मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांचा उल्लेख अधिसूचनेत आहे.

गणना कर्मचाऱ्याची जबाबदारी

एन्यूमरेटर म्हणजेच गणना कर्मचाऱ्याचे मुख्य काम घरोघरी जात लोकांकडून माहिती जमविणे असते. तो निश्चित प्रश्नांनी युक्त प्रश्नावलीच्या आधारावर परिवार किंवा व्यक्तींना प्रश्न विचारतो आणि त्यांची उत्तरे योग्यपद्धतीने नोंदवून घेतो. माहिती पूर्ण अन् विश्वसनीय असेल हे त्याला सुनिश्चित करावे लागते. गरज भासल्यास तो लोकांना प्रश्न समजावून सांगण्यास मदत करू शकतो, जेणेकरून उत्तर योग्य पद्धतीने नोंद होऊ शकेल. जमविण्यात आलेल्या आकडेवारीचा वापर जनगणना आणि सांख्यिकीय विश्लेषणासाठी केला जातो.

 

Comments are closed.