प्रबोधन-मार्मिक विनोदी कथा स्पर्धा ‘मानकरी तातल्या’ सर्वोत्कृष्ट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘प्रबोधन गोरेगाव’ आणि ‘साप्ताहिक मार्मिक’ यांच्यातर्फे आयोजित विनोदी कथा स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेत सदाशिव पाटगावकर लिखित ‘मानकरी तातल्या’ ही कथा प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराची मानकरी ठरली. यंदा प्रथमच घेण्यात आलेल्या लघुत्तम कथा स्पर्धेत प्राजक्ता पांगारकर यांच्या ‘मानसी’ या कथेने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

प्रबोधन संस्थेचे धडाडीचे कार्यकर्ते, कट्टर शिवसैनिक व साहित्यसेवक वसंत तावडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून आयोजित या स्पर्धेसाठी राज्यभरातून सकस कथा प्राप्त झाल्या. विनोदी लेखक सॅबी परेरा आणि पत्रकार विनोद पितळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. लघुत्तम कथांचे परीक्षण ‘साप्ताहिक मार्मिक’चे कार्यकारी संपादक मुकेश माचकर यांनी केले. प्रबोधनचे विजय नाडकर्णी यांनी कथांची प्राथमिक छाननी केली. प्रबोधनचे प्रमुख कार्यवाह गोविंद गावडे यांनी समन्वयाची जबाबदारी पार पाडली. ‘मानकरी तातल्या’ आणि ‘मानसी’ या दोन कथा ‘मार्मिक’च्या दिवाळी अंकात प्रकाशित होणार असून अन्य विजेत्या कथा-लघुत्तम कथा ‘मार्मिक’च्या नियमित अंकांत प्रकाशित होतील.

विनोदी कथा स्पर्धेत वैशाली देवडीकर (दाराआडचा चोर) आणि अमित पंडित (गोष्ट एका पेनाची) यांच्या कथांना दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळाला. संध्या सामंत (गाव गर्दी गजाली) आणि डॉ. अविनाश भोंडवे (आनंदाची बातमी) यांच्या कथांना उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाला.

लघुत्तम कथा स्पर्धेत राधिका जोशी यांच्या ‘हिशोब’ने दुसरा तर अशोक गोवंडे यांच्या ‘नेव्हर लव्ह अ स्ट्रेंजर’ने तिसरा पुरस्कार पटकावला. प्रा. अरुण पाटील यांची ‘बळी’ आणि वंदना ताम्हणे यांची ‘मॉडर्न भूत’ कथा उत्तेजनार्थ ठरली.

Comments are closed.