मोठी बातमी! महेला जयवर्धनेने मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा, रोहित कर्णधारपदाच्या….
श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेने आयपीएलमधील (इंडियन प्रीमियर लीग) मुंबई इंडियन्सच्या (MI) मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. फ्रॅंचायझीने शनिवारी (१७ ऑक्टोबर) सोशल मीडियामार्फत अधिकृतपणे जयवर्धनेच्या बाहेर पडण्याच्या वृत्ताला दुजोरा देणारे निवेदन प्रसिद्ध केले.
मुख्य प्रशिक्षक म्हणून जयवर्धनेच्या कार्यकाळात मुंबईने २०१७, २०१९ आणि २०२० असे ३ हंगामांत आयपीएल विजेतेपद जिंकली. या तिन्ही वेळी रोहित शर्मा संघाचा कर्णधार होता. त्यामुळे MIच्या इतिहासातील ही सर्वात यशस्वी कर्णधार-मुख्य प्रशिक्षक जोडी होती.
मुंबई इंडियन्सने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले की, २०१७ ते २०२२ आणि पुन्हा २०२४ ते २०२६ या दोन कार्यकाळांमध्ये, जयवर्धनने फ्रँचायझीची संस्कृती घडवण्यात, एक मजबूत सांघिक वातावरण निर्माण करण्यात आणि शिस्त, सहकार्य व संघ-प्रथम या मूल्यांवर आधारित दृष्टिकोनाचे समर्थन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
जयवर्धनेच्या राजीनाम्यामुळे फ्रॅंचायझीतील एका पर्वाचा शेवट झाला आहे. त्यामुळे आता ही फ्रॅंचायझी नवी दिशा ठरवण्याच्या प्रयत्न करेल. त्यात रोहित पुन्हा कर्णधारपद स्वीकारण्याच्या शक्यतेने फ्रॅंचायझीच्या पुढील हंगामाच्या योजनेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
राजीनाम्याबाबत भावूक होत जयवर्धने म्हणाला, “गेल्या दशकाहून अधिक काळापासून मुंबई इंडियन्स माझ्या प्रवासाचा एक खूप खास भाग आहे. खेळाडू, प्रशिक्षण संघ, #OneFamily अविश्वसनीय पाठिंबा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चाहत्यांनी हा एक असा अनुभव बनवला आहे जो मी नेहमीच जपून ठेवीन.
आपण सर्वांनी मिळून काही अविस्मरणीय क्षण अनुभवले आहेत, आव्हानांवर मात केली आहे आणि अशी एक गोष्ट उभारली आहे, ज्याचा आम्हा सर्वांना अभिमान वाटेल. मी श्रीमती नीता अंबानी आणि आकाश अंबानी यांचे त्यांच्या वर्षानुवर्षे असलेल्या अढळ विश्वासासाठी, पाठिंब्यासाठी आणि मैत्रीसाठी मनापासून आभार मानू इच्छितो. आपण सर्वांनी मिळून जे काही मिळवले आहे, त्याचा मला प्रचंड अभिमान वाटतो आणि माझ्या हृदयात एमआयसाठी नेहमीच एक विशेष स्थान राहील. मी संघाला पुढील वर्षांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो,” असेही पुढे जयवर्धनेने म्हटले आहे.
Comments are closed.