पावसाच्या हजेरीने कोल्हापूरकरांना दिलासा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सुपर एल निनोच्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा सर्वत्र कमी पाऊस झाला. सप्टेंबर महिना कोरडा गेला. तर परतीच्या पावसानेही पाठ फिरवल्यामुळे, बहुतांश पिकांनी माना टाकल्या. जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱयांसह नागरिक हवालदिल झाले होते. त्यातच ऑक्टोबर हिटमुळे जीवाची घालमेल होत असतानाच, आज सायंकाळी ढगांच्या गडगटासह आलेल्या पावसाने सुमारे तासभर कोल्हापूरला झोडपले.

हवामान खात्याने शनिवारपासून चार दिवस ढगांच्या गडगडासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. काल रात्री शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत पावसाने हजेरी लावली, तर आज सायंकाळी झालेल्या पावसाने काही काळ वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

दरम्यान, सर्वत्र नवरात्रोत्सव मोठय़ा उत्साहात सुरू असून, देवदर्शनासाठी सर्व मंदिरात भाविकांची गर्दी आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातही दररोज एक लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी रांगा लावत आहेत. आज दुपारी आलेल्या पावसामुळे भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली. मंदिर परिसरातील दुकानांचा आडोसा घ्यावा लागला.पावसामुळे शेतकऱयांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी, पिकांच्या पुनर्वाढीसाठी आणखी पावसाची गरज आहे.

Comments are closed.