Helicopter Crash – सौदी अरेबियामध्ये हेलिकॉप्टर कोसळले, दोन क्रू मेंबर्स ठार
सौदी अरेबियातील नजराण भागात हेलिकॉप्टर कोसळून दोन क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. तांत्रिक बिघाड झाल्याने हे हेलिकॉप्टर सौदी नॅशनल गार्ड मंत्रालयाच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या भागात कोसळले, असे सौदी-नेतृत्वाखालील आघाडीचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल तुर्की अल-मालिकी यांनी रविवारी एका निवेदनात सांगितले.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, सौदी अरेबियाचे AH-6i हे Apache हेलिकॉप्टर कोसळले. दरम्यान, हुथी गटाचे लष्करी प्रवक्ते याह्या सारी यांनी शनिवारी ‘एक्स’ वर पोस्ट करून दावा केला की, त्यांच्या दलांनी नजराणजवळ सौदीचे ‘अपाचे’ हेलिकॉप्टर पाडले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे हेलिकॉप्टर सीमेवरील हुथी ठिकाणांना लक्ष्य करून शत्रुत्वाची कारवाई करत होते. दोन्ही बाजूंनी ज्या हेलिकॉप्टरचा उल्लेख केला आहे, ते एकच आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Comments are closed.