मेलोनींच्या देशात जनतेचं बंड, महागाईविरोधात हिंसक निदर्शनं; मिलानमध्ये दुकानं लुटली, आगी लावल्या, 50 जणांना अटक
इटलीमध्ये महागाईविरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. महागाई आणि युद्धाविरोधात शनिवारी काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. मिलानच्या मध्यवर्ती भागात आंदोलक आणि पोलिसांमध्ये राडा झाला. यानंतर आंदोलकांना दुकानं लुटली आणि स्थावर मालमत्तेची जाळपोळ केली. परिस्थिती बिघडल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि पाण्याचे फवारे मारत गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. या संघर्षात दोन पोलीस अधिकारी जखमी झाले असून 50 हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Comments are closed.