तिरुअनंतपुरम विमानतळ मंगळवारी बंद राहणार – TMarathiNews
तिरुअनंतपुरम : केरळच्या तिरुअनंतपुरम विमानतळावर 20 ऑक्टोबर म्हणजेच मंगळवारी संध्याकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत विमानसेवा बंद राहणार आहे. श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या आराट्टू शोभायात्रेला धावपट्टीवरून जाऊ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विमानतळ व्यवस्थापनानुसार प्रवाशांना विमानो•ाणांच्या बदललेल्या वेळेची माहिती संबंधित एअरलाइन्सकडून प्राप्त होणार आहे. मंदिराची शोभायात्रा वर्षातून दोनवेळा धावपट्टीवरून जात शंगुमुघम समुद्र किनाऱ्यापर्यंत जाते. तेथे भगवानाच्या पवित्र मूर्तींचे पवित्र स्नान करविण्यात येते. यादरम्यान विमानो•ाणांना रोखण्यात येते.
Comments are closed.