मंत्रालयजवळ स्कॉर्पिओची बेस्ट बसला धडक, अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मंत्रालयाजवळ बेस्ट बसला अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर बस टाटा कंपनीची भाडेतत्वावरील अतिरिक्त बस होती. याप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात स्कॉर्पिओ चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातग्रस्त बस बॅकबे आगारात नेण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, बॅकबे आगारातून अतिरिक्त बस म्हणून रविवारी सकाळी ही बस चर्चगेटच्या दिशेने चालली होती. यादरम्यान 6.30 वाजण्याच्या सुमारास वाय. बी. चव्हाण बस थांब्याजवळ समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीने बसच्या समोरील उजव्या कोपऱ्याला धडक दिली. या धडकेमुळे बसच्या समोरील उजव्या बाजूचे बॉडी पॅनेल क्षतिग्रस्त होऊन फाटले. तसेच समोरील विंडस्क्रीनची काच फुटली, चालकाच्या दरवाजाखालील पायरी आणि स्टिअरिंग रॉडही तुटला.

अपघातात स्कॉर्पिओ वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. स्कॉर्पिओचा समोरील उजवा कोपरा पूर्णपणे नष्ट झाला, विंडस्क्रीनची काच फुटली. तसेच समोरील उजव्या बाजूचे टायर बाहेर आले, उजव्या बाजूचा दरवाजा आणि बोनेटचेही नुकसान झाले. या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. अपघातापूर्वी बसमध्ये कोणतीही तांत्रिक त्रुटी किंवा ब्रेकशी संबंधित समस्या असल्याबाबत चालकाची कोणतीही तक्रार नव्हती. याप्रकरणी कफ परेड पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Comments are closed.