Dussehra Wishes: नातेवाईकांसह मित्रांना पाठवा या खास शुभेच्छा




शुभेच्छा


साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा सण दसरा म्हणजेच विजयादशमी! हिंदू संस्कृतीत या दिवसाला विशेष महत्त्व आहे. प्रभू श्री राम यांनी आजच्याच दिवशी लंकापती रावणाचा वध करून असत्यावर सत्याचा विजय मिळवला होता, तर दुसरीकडे देवी दुर्गाने नऊ दिवस महिषासुराशी युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी विजयाची प्रस्थापना केली होती. या दिवशी आपट्याची पाने (ज्याला सोने म्हणून लुटले जाते) एकमेकांना देऊन आदर आणि आपुलकी व्यक्त करण्याची परंपरा आहे. आजच्या या शुभ दिनी प्रियजनांना कोणत्या शुभेच्छा पाठवता येतील हे पाहूयात.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक
दसरा सण विजयाचा
देवीने केला वध असूराचा
दिन पराक्रमाचा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !

साडेतीन मुहूर्तांपैंकी एक मुहूर्त
सण हा दसऱ्याचा अन् विजयादशमीचा
दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !

जल्लोष विजयाचा
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त
सण हा दसऱ्याचा
दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा !

आंब्याच्या पानांच्या तोरणांनी दरवाजा सजला
झेंडुच्या फुलांनी दसऱ्याचा सण बहरला
सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !

सांगता नवरात्रीची
जल्लोष विजयाचा
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त
सण हा दसऱ्याचा..
दसऱ्याच्या शुभेच्छा !

रावण फक्त बाहेरचा नाही
मनातला वाईटपणाही नष्ट करा
दसऱ्याला ठरवू मन शुद्ध करायचं
सत्याच्या प्रकाशात जीवन जगायचं!
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा…!

हेही वाचा – सोनं मानल्या जाणाऱ्या आपट्याच्या पानांमध्ये दडलंय आरोग्याचं रहस्य



Comments are closed.