होमस्टे निवडताना या चुका टाळा; अन्यथा होईल मनस्ताप

सध्या हॉटेल्सऐवजी होमस्टे निवडण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. स्थानिक संस्कृतीचा अनुभव, घरगुती जेवण आणि बजेटमध्ये बसणारा पर्याय म्हणून होमस्टेकडे पाहिलं जातं. मात्र, घाईगडबडीत किंवा केवळ आकर्षक फोटो पाहून होमस्टेचे बुकिंग करणं अनेकदा पर्यटकांच्या अंगाशी येऊ शकते. सुट्ट्यांचा आनंद द्विगुणित करायचा असेल, तर होमस्टे निवडताना कोणत्या चुका टाळायला हव्यात हे जाणून घेऊयात.

रिव्ह्यू न वाचणे

फक्त वेबसाइटवरील फोटो पाहून बुकिंग करण्याची चूक करू नये. ऑनलाइन दाखवलेले फोटो जुने किंवा एडिट केलेले असू शकतात. त्यामुळे तिथे आधी राहून आलेल्या पर्यटकांचे रिव्ह्यू आणि फोटो तपासावेत.

लोकेशनकडे दुर्लक्ष

अनेकदा होमस्टे स्वस्त मिळतात, पण ते शहरापासून खूप लांब असतात. त्यामुळे प्रवासातच जास्त वेळ आणि पैसा खर्च होतो. त्यामुळे होमस्टे निवडताना सुरक्षितता, रस्ते आणि वाहतुकीची साधने उपलब्ध आहेत का, हे आधीच तपासून घ्यावं.

सुविधांची खात्री न करणे

वाय-फाय, पार्किंग, गिझर, होमस्टेमध्ये मिळणारे जेवण किंवा किचन वापराचे चार्जेस या गोष्टींची आधीच चौकशी करावी.

रद्द करण्याची पॉलिसी

काही आपत्कालीन परिस्थितीमुळे प्लॅन बदलावा लागल्यास रिफंड मिळतो की नाही, याचे नियम आधीच वाचून घ्यावेत.

हेही वाचा – Posthumous Marriage: असं गाव जिथे मृतांशी केलं जातं लग्न

Comments are closed.