स्लिम दिसणे म्हणजे फिट आहात असे नाही

जर तुम्ही शरीराने बेताचे असाल,वजनही कमी आहे. स्लिम दिसता. बरीच धावपळही करता. याचा अर्थ तुम्ही फिट आहात असा होत नाही. कारण कधी कधी शरीरावर न दिसणाऱ्या आजाराचे लक्षण शरीरात लपलेले असते. यामुळे वजन कमी असल्याने आपण फिट आहोत किंवा आपल्याला कोणताही आजार होऊच शकत नाही या भ्रमात राहू नये

तज्ज्ञानुसार तुम्ही कधीही बाहेरचं खात नसाल , घरात शिजवलेलंच अन्न खात असाल, नियमित व्यायाम करता , सगळी काम करता. पण तरीही कदाचित तुमचं शरीर आतून आजारी असू शकता. इंग्लंडमधील बायोबँक कोहोर्ट स्टडीनुसार १५ पैकी १ व्यक्ती ज्याचा बीएमआय नॉर्मल आहे त्याला हदृयाशी संबधित कसली ना कसली व्याधी असतेच शिवाय अशा व्यक्तींना पचनसंस्थेशी आजाराचा धोकाही असतोच. एवढेच नाही तर त्यांचे वजनही कमी असते. त्यामुळे अशा व्यक्ती स्वतला फिट समजू लागतात. पण प्रत्यक्षात शरीरावरून एखाद्या आजाराचा अंदाज लावू नये. तर त्यासाठी काही नियमित चाचण्या करणे गरजेचे आहे.

हाय रक्तदाब

ज्या व्यक्ती डाएट करतात. मोजून मापून खातात, नियमित व्यायाम करतात. ज्यांचे वजनही कमी आहे. त्यांनाही हाय ब्लड प्रेशर असते. अशावेळी योग्य ट्रिटमेंट न घेतल्यास भविष्यात हायपरटेंशन, हदृयाशी संबंधित व्याधी, स्ट्रोक, हार्ट फेल , किंडनीचा आजार होण्याचा धोका असतो. यामुळे फक्त जास्त वजन असेल त्यांनाच बीपीची समस्या असते असे समजू नये तर खूप घाम येणे, अस्वस्थ वाटणे, छातीत धडधडणे, चक्कर, भोवळ येणे, डोके दुखी , उलट्या अशी लक्षण दिसल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जावे.

थकवा

जर तुमचे वजनही कमी आहे, तुम्ही नियमित व्यायाम आणि इतर काम करता. पण तरीही तुम्हाला खूप थकवा येतो. धाप लागते. तर हे स्ट्रेस,अनीमिया,किंवा थायरॉईडचे लक्षण असू शकते. पण जर तुम्हाला वारंवार लघवीला होत असेल, धाप लागत असेल वजन वाढत किंवा कमी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या.

झोप न लागणे

जर शांत झोप लागल्यानंतर अचानक जाग येते. त्यानंतर झोप लागतच नाही. सकाळी उठल्यावर डोक दुखणे किंवा उदासीन वाटणं ही समस्या तुम्हाला होत असेल तर हे स्लिप अॅप्नियाचे लक्षण आहे. ज्यात झोपल्यावर श्वास घेण्य़ास त्रास होतो. ही समस्या जाड किंवा बारीक किंवा फिट असणाऱ्या व्यक्तीलाही होऊ शकते. कारण हदृयाशी संबंधित समस्यांचे मूळ बऱ्याच वेळा हाय ब्लड प्रेशरशी असते. यामुळे रात्री झोपल्यानंतरही दुसऱ्य़ादिवशी दिवसभर झोप येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

अचानक तहान लागणे, लघवी होणे

जर तुम्हाला वारंवार लघवीला जावे लागत असेल ,नेहमीपेक्षा जास्त तहान लागत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नये. कारण ही लक्षण किडनीशी संबंधित आहेत. नॅशनल हॅल्थ सर्विसनुसार ही लक्षणे किडनीशी संबंधित आजाराची असू शकतात. यामुळे जरी तुमचे वजन कमी असेल तुम्हाला तुम्ही हेल्दी आहात असे वाटत असेल तरी ही लक्षणे तुमचे शरीरा आतून आजारी असल्याचे तुम्हाला सांगत असते.

हदृयाचे ठोके

जर तुमचे वजन कमी आहे, तुम्ही डाएट जीमही करता. पण कधी कधी स्ट्रेस आल्यावर, चहा कॉफी पिल्यावर, व्यायाम करताना अचानक तुमचे हदृयाचे ठोके वाढतात, छातीत धडधड होते. काहीवेळानंतर सगळं नॉर्मल होत? तर याकडे दुर्लक्ष करू नको.

Comments are closed.