एप्रिलमध्ये मोदी सत्तेतून जाणार, संजय राऊत यांचा जोरदार हल्ला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी मुहूर्त काढला होता. हा मुहूर्त चुकला आणि राम मंदिराची लूट झाली. ज्या अयोध्येत आम्ही सर्व आंदोलनात सहभागी झालो. रक्त सांडले. ते राम मंदिर जिथे उभे राहिले तिथे भाजपच्या चोरांनी लूट केली, असा घणाघात करतानाच आता मोदी एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात सत्तेतून जाणार, असा हल्ला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला.

अल्बानियामधील सुप्रीम कोर्टाने तिथल्या भ्रष्ट पंतप्रधानांना साथ दिल्यामुळे जनतेने सुप्रीम कोर्टच जाळले. हिंदुस्थानमध्येही लाखो लोक रस्त्यावर आले आहेत. आता मोदी-शहांना लोक घाबरत नाहीत. मोदींविरोधात इतके प्रचंड जनमत असताना यांना मत देतंय कोण? तर ज्ञानू, असे सांगत मतोचोरीवर घणाघात केला.

अमर्याद शहाच लॉरेन्स बिष्णोई

मुंबईचे अंडरवर्ल्ड बघत आम्ही वाढलोय. त्यामुळे कोण कुठून हत्यार काढेल, कुठे चालवेल याची आम्हालाही माहिती असते. लॉरेन्स बिष्णोई आहे कुठे? लॉरेन्स बिष्णोई अस्तित्वातच नाही, अमित शहा हेच लॉरेन्स बिष्णोई आहेत, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.

पुढच्या वर्षीच्या दसरा मेळाव्यात धनुष्यबाण असेल

छातीवर गोळय़ा झेलू, पण या देशात तिरंगा फडकवण्याच्या विरोधात असणाऱ्या सरकारला तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही. तख्त बदल दो, ताज बदल दो, व्होट चोरोंका, राज बदलदो, बेईमानोका राज बदलदो… हे सांगण्यासाठी आजचा विराट दसरा मेळावा होत असल्याचा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला. पुढच्या वर्षीच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचा धनुष्यबाण असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Comments are closed.