टायगर श्रॉफवरील गोळीबार : दिल्लीत दोन महिलांसह चौघांना अटक कोटा येथे पकडलेल्या हल्लेखोरांना मुंबईत आणणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार करणाऱया आरोपींना मुंबई गुन्हे शाखेचे पथक राजस्थानमधील कोटा येथून मुंबईत घेऊन येत आहेत. हे पथक सुरक्षेच्या दृष्टीने रात्रीचा प्रवास टाळून दिवसाच मुंबईच्या दिशेने निघाले. मुंबईत आणल्यानंतर तिन्ही आरोपींची कसून चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर या हल्ल्यामागील कटाचा उलगडा होईल. त्यातला एक आरोपी हा रॅपिडो चालक होता. पण 14 ऑक्टोबरपासून तो रॅपिडो कॅप्टन म्हणून कार्यरत नव्हता, असा खुलासा रॅपिडो पंपनीकडून देण्यात आला आहे. दरम्यान, हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन महिलांसह चार जणांना अटक केली आहे.

टायगर श्रॉफवर रविवारी गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी फुल सिंग, रेहान आणि ऋतिक यांना कोटा रेल्वे स्थानकात पकडण्यात आले. आता त्यांना मुंबईत आणण्यात येणार आहे. याशिवाय दिल्ली पोलिसांनी कुणाल, सुमित, राधा आणि बबीता या चार आरोपींना अटक केली आहे. ते परदेशातील एका गँगस्टरच्या संपका&त होते. त्यांना ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिसांचा ट्रान्झिट रिमांड सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे.

Comments are closed.