शफाली वर्मा बनली भारताची सिक्सर क्वीन! हरमनप्रीत कौरचा 8 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर शफाली वर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यापासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. 2026 साल संपायला अजून बराच कालावधी शिल्लक असतानाच, शफालीने एक मोठा टप्पा गाठला आहे. एका कॅलेंडर वर्षात भारतासाठी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारी फलंदाज ती ठरली आहे. या कामगिरीसह तिने माजी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नावावर गेल्या आठ वर्षांपासून असलेला विक्रम मोडीत काढला आहे.
काल, 20 ऑक्टोबर रोजी झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात शफाली वर्माने 5 षटकार ठोकले. तिच्या खेळीतील पाचव्या षटकारासह, 2026 या वर्षात तिचे टी-20 क्रिकेटमधील एकूण षटकारांची संख्या 52 वर पोहोचली.
याआधी, 2018 या कॅलेंडर वर्षात हरमनप्रीत कौरने भारतासाठी टी-20 क्रिकेटमध्ये 51 षटकार मारले होते. आता शफालीने 52 षटकार मारून हा विक्रम मागे टाकला आहे आणि एका वर्षात भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारी फलंदाज बनली आहे.
महिला टी-20 क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार
67 षटकार – सोफी डिव्हाइन (2018)
61 षटकार – सोफी डिव्हाइन (2020)
55 षटकार – सोफी डिव्हाइन (2023)
53 षटकार – लिझेल ली (2018)
52 षटकार – शफाली वर्मा (2025)
51 षटकार – हरमनप्रीत कौर (2018)
न्यूझीलंडची सोफी डिव्हाइन या यादीत अव्वल स्थानी आहे; तिने तीन वेगवेगळ्या वर्षांत 55 पेक्षा जास्त षटकार मारले आहेत. शफाली वर्मानेही आता या यादीत आपले स्थान निर्माण केले असून, तिच्या आक्रमक फलंदाजीची ताकद दिसून येते.
Comments are closed.