पॅरिस लवकरच बनेल मुस्लिम शहर : ट्रंप – TMarathiNews
पॅरिस : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस लवकरच एक मुस्लिम शहर बनेल, असा दावा केला असून फ्रान्समध्ये सुरू असलेल्या हिंसाचारासाठी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यांच्या स्थलांतरविषयक धोरणांना जबाबदार धरले आहे. ट्रम्प यांनी बऱ्याच काळापासून कठोर स्थलांतर धोरणांचे समर्थन केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, त्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वीच मॅक्राँ यांना इशारा दिला होता की, इतर देशांतील लोकांना मोठ्या संख्येने फ्रान्समध्ये येऊ देणे ही एक चूक आहे. असे असूनही हे थांबवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात सरकारने अपयश आले. प्यू रिसर्च सेंटरनुसार, फ्रान्समधील सुमारे ४६ टक्के लोकसंख्या ख्रिश्चन आहे. सुमारे ४३ टक्के लोक कोणत्याही धर्माचे नाहीत. लोकसंख्येच्या सुमारे ९ टक्के मुस्लिम आहेत. तर हिंदू बौद्ध आणि इतर धर्मांचे अनुयायी
सुमारे १ टक्का आहेत.
ट्रम्प यांनी फ्रान्समधील हिंसाचाराचा संबंध इतर देशांतील लोकांच्या स्थलांतराशी संबंधित धोरणाशी जोडला आहे. तथापि, तज्ज्ञांच्या मते फ्रान्समधील परिस्थिती महागाई, दैनंदिन वस्तूंच्या वाढत्या किमती, आर्थिक समस्या, सरकारी सेवांवरील वाढता ताण आणि तरुणांचा संताप यासारख्या समस्यांमुळे देखील उद्भवलेली आहे. उजव्या फ्रान्समधील विचारसरणीचे स्थलांतरासंबंधी अधिक कठोर उपाययोजनांची मागणी करू लागले आहेत.
Comments are closed.