पंकजा मुंडे यांनी दत्तक घेतले आंतरवली सराटी गाव

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भाजप नेत्या व राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज भगवान गडावरील दसरा मेळाव्याला संबोधित करताना जालना जिह्यातील आंतरवली सराटी हे गाव दत्तक घेण्याची घोषणा केली. आंतरवली सराटी हे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रस्थान राहिले आहे.

माझ्या बीड जिह्यातील प्रत्येक गावाइतकेच मी आंतरवलीवर प्रेम करणार आहे. गावाचा विकास करणार आहे, असे पंकजा म्हणाल्या. दुष्काळाचे संकट भीषण आहे. दुष्काळ श्रीमंत-गरीबांवर वेगळा येत नाही. ऊन गरीब-श्रीमंताला वेगळं लागत नाही. तहान दोघांनाही सारखीच लागते. जनावराचा चारा वेगळा असत नाही, असे सांगताना या दुष्काळात जातीच्या भिंती तोडून टाकायच्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

जातीपातीचं राजकारण करणाऱया नेत्याला भविष्य नाही!

जातीपातीच्या जिवावर जो नेता राजकारण करू इच्छितो, मोठा होऊ इच्छितो त्याला भविष्य नाही. एखादा शिक्षित हुशार माणूस नेतृत्व करू शकतो. मात्र शिक्षणाशिवाय अजेंडा नसलेला माणूस देशाला विचारी दिशा देऊ शकत नाही. तो विखारी आणि विषारीच दिशा देईल, अशी टीका कोणाचाही नामोल्लेख न करता त्यांनी केली. या मेळाव्याला आमदार धनंजय मुंडे, महादेव जानकर, प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे उपस्थित होते.

Comments are closed.