केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांचा जेफ्री एपस्टीनसोबतचा फोटो व्हायरल, संजय राऊत यांनी साधला निशाणा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांचा अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणातील गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत एपस्टीनसोबत हरदीपसिंग पुरी यांची चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. या फोटोवरून सध्या हरदीपसिंग पुरी यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी देखील हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ”मोदीजींचे एक मंत्री हरदीपसिंग पुरी हे जेफ्री एपस्टीनला एकट्यात भेटले? कुणाचा निरोप घेऊन ते एपस्टीनला भेटले असतील? ही तर सुरुवात आहे. पुढे पुढे बघा काय होणार आहे. सत्तापालट होणार. जय हिंद”, असे संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.

अमेरिका सरकार खुल्या केलेल्या एपस्टीन फाईल्समध्ये केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांचा उल्लेख अनेकदा आला आहे. काँग्रेसने देखील यावरून हरदीपसिंग पुरी यांच्यावर जोरदार टीका केली होती. पुरी यांनी सरकारची धोरणात्मक माहिती एपस्टीनला पुरवल्याचा दावाही काँग्रेस नेते पवन खेरा यांनी केला होता.

काँग्रेसने दिल्या होत्या एपस्टीन व पुरी यांच्या भेटीच्या तारखा

नऊ वेळा भेट

5 जून 2014
6 जून 2014
8 जून 2014
9 जून 2014
19 सप्टेंबर 2014
13 सप्टेंबर 2014
24 सप्टेंबर 2014
9 ऑक्टोबर 2014
10 ऑक्टोबर 2014

Comments are closed.