प्रसिद्ध गायक कृष्णराज यांचे निधन
तामिळी चित्रपटसृष्टीतील संगीत क्षेत्राला मोठा धक्का
वृत्तसंस्था/चेन्नई
तामिळनाडूतील प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णराज रामास्वामी यांचे गुरुवारी वयाच्या 75 व्या वर्षी चेन्नई येथे निधन झाले. कृष्णराज यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी सेलम जिह्यातील त्यांच्या मूळ गावी, वेंबडीथलम येथे नेल्यानंतर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या निधनाने तामिळी चित्रपट संगीत क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अज्ञात आहे. कृष्णराज आणि संगीतकार देवा या जोडीने दीर्घकाळ एकत्र काम करताना अनेक अविस्मरणीय गाणी तयार केली. त्यांच्यात एक घनिष्ठ व्यावसायिक नाते होते. तामिळी चित्रपटसृष्टीतील संगीतकार देवा यांच्या निधनानंतर आता देवा यांचेही देहावसान झाल्याने संगीत क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
संगीतकार देवा यांचे 17 ऑक्टोबर रोजी निधन झाले होते. देवा आणि कृष्णराज यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. त्यांचे सहकार्य तामिळी संगीतप्रेमींमध्ये लोकप्रिय होते. कृष्णराज यांचा वैशिष्ट्यापूर्ण आवाज आणि भावपूर्ण गाण्यांनी चाहत्यांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांचे निधन तामिळ चित्रपटसृष्टीसाठी एक मोठी हानी आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते सी. जोसेफ विजय यांनी कृष्णराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दु:खद भावना व्यक्त करताना आपल्याला मोठा धक्का बसल्याचे म्हटले आहे. त्यांनी दिवंगत गायकाच्या कुटुंबीय, मित्र, सहकारी आणि संगीतप्रेमींप्रति शोक व्यक्त केला.
Comments are closed.