फ्रान्समध्ये तणावामुळे भारतीयांसाठी अलर्ट जारी
हिंसाचाराच्या ठिकाणांपासून दूर राहण्याचा सल्ला
► वृत्तसंस्था/ पॅरिस
फ्रान्समध्ये सुरू असलेली आंदोलने आणि त्यानंतर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांसाठी प्रवासासंबंधी सावधगिरीचे निर्देश दिले आहेत. या सूचनेनुसार, भारतीय नागरिकांनी संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहावे आणि सावधगिरी बाळगावी, असा अलर्ट जारी केला आहे. दूतावासाने भारतीय नागरिकांना मोठ्या गर्दीच्या ठिकाणी आणि निदर्शने होत असलेल्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, स्थानिक फ्रेंच अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सूचना आणि सल्ल्यांचे पालन करण्यासही बजावले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत भारतीय नागरिक पॅरिसमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधू शकतात असेही कळविण्यात आले आहे.
Comments are closed.