ते विरोधकांचा सूड घेत आहेत! नसीरुद्दीन शाह भाजपवर संतापले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. देशातील प्रत्येक लहान-मोठ्या समस्येवर ते निर्भीडपणे बोलतात. अलीकडेच,त्यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाबाबतही मत व्यक्त केले होते. आता त्यांनी भाजपवर उघडपणे हल्ला चढवला आहे.

नसीरुद्दीन शाह यांनी पुन्हा एकदा भाजपवर तीव्र हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, पश्चिम बंगाल निवडणुकीतील फसव्या विजयानंतर, हा भाजप एक खोटा पक्ष आता त्याच्या विचारधारा आणि धोरणांशी असहमत असलेल्या सर्वांवर सूड उगवण्यासाठी टपला आहे. या सूडाचे ताजे बळी सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी आणि भावी चित्रपट निर्माते आहेत.

प्रशासनाकडून उत्तरदायित्वाची मागणी करण्याच्या बदल्यात, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली आहे, त्यांना धमक्या देण्यात आल्या आहेत आणि आता तर वसतिगृह खाली करण्यासही सांगितले जात आहे,अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

नसीरुद्दीन शाह यांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी, जुलैमध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान, या अभिनेत्याने आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला होता आणि त्यांच्यावरील कारवाईवर टीका केली होती.

Comments are closed.