सॉरी बोलण्याचे दुष्परिणाम

आपलं काही चुकलं असेल किंवा आपल्यामुळे कोणाचं नुकसान झालं असेल वा समोरच्याला त्रास झाला असेल किंवा होऊ शकतो तेव्हा शिष्टाचार म्हणून सॉरी बोलावं हे आपल्याला लहानपणीच शिकवलेलं आहे. त्यामुळे सॉरी हा शब्द आपण दिवसातून अनेकदा छोट्या मोठ्या गोष्टींसाठीही कोणाला ना कोणाला बोलत असतो. पण या सॉरीचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा आपला आत्निविश्वास तर डळमळतोच शिवाय समोरचा तुम्हाला गृहीत धरायला लागतो. यामुळे सॉरी केव्हा बोलावं आणि केव्हा टाळावं ते समजणं गरजेचे आहे.

आपल्याकडून चूक झाल्यास ती स्विकारून समोरच्याला सॉरी म्हणजे माफ करा बोलणं हे तुमच्यावरील संस्कार आणि तुमच्यातील सज्जनपणाचा गुण दर्शवतो. पण आजच्या काळात उठसूठ सॉरी बोलण्याचे दुष्परिणामच बघायला मिळतात. समोरची व्यक्ती तुम्हाला कमकुवत समजू लागते. तुमच्यात प्रतिकार करण्याची किंवा प्रत्युत्तर देण्याची हिंमत नसल्याचा समज होतो. त्यामुळे अशा काही ठिकाणी किंवा प्रसंगी सॉरी बोलणं टाळावं.

या प्रसंगी सॉरी बोलू नये

प्रश्न आणि मदतीसाठी विचारताना

सॉरी तुम्ही माझी काही मदत करू शकता का? सॉरी मी एक प्रश्न विचारू शकतो का ? असे कोणाला विचारू नये. कारण प्रश्न विचारणे, मदत मागणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे.

मत मांडणे
जर एखाद्या मुद्द्यावर तुमचे मत इतरांपेक्षा वेगळे असेल तर त्यासाठी सॉरी न बोलता आपला मुद्दा आत्मविश्वासाने समोरच्याच्या पुढे मांडावा.

नकार द्यायला शिका

जर एखादे काम करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर स्पष्टपणे नाही बोलायला शिका. सॉरी बोलू नको.

दुसऱ्यांची चूक

बऱ्याचवेळा वाद टाळण्यासाठी, नात टिकवण्यासाठी स्वत:ची चूक नसताना आणि समोरचा चूकीचा होता हे माहीत असूनही सॉरी बोलले जाते. पण यामुळे तुम्ही गृहीत धरले जाता.

सॉरी तेव्हाच बोलावे जेव्हा खरोखरं तुमची चूक असते. त्यामुळे अशा प्रसंगातच तुमचा प्रामाणिकपणा आणि जबाबदारी स्विकारण्याची क्षमता जगाला दिसते.

Comments are closed.