IPL 2027 – सलग तीन वेळा इंग्लिश काउंटी संघाला चॅम्पियन बनवणारा प्रशिक्षक आता CSK ला धडे देणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चेन्नई सुपर किंग्सने आगामी हंगामासाठी विजेतेपदत पटकावण्याच्या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानचा अनुभवी माजी गोलंदाज झहीर खानची चेन्नईने मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. आता CSK ने आयपीएल 2027 साठी इंग्लंडचा माजी गोलंदाज गॅरेथ बॅटी याची संघाच्या साहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.

गॅरेथ बॅटीला प्रशिक्षकपदाचा तगडा अनुभव असून त्याच्या मार्गदर्शनाखाली इंग्लिश काउंटी संघ सरेने 2022 ते 2024 या काळात सलग तीन वेळा काउंटी चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले होते. गॅरेथ बॅटीच्या याच अनुभवाचा फायदा चेन्नईला होईल, अशी संघाला अपेक्षा आहे. सरे संघाने सोशल मीडियावर पोस्ट करत बॅटीच्या सीएसकेमधील नवीन भूमिकेची अधिकृत माहिती दिली आहे. आता बॅटी चेन्नईचा मुख्य प्रशिक्षक झहीर खान सोबत कोचिंग स्टाफची धुरा सांभाळणार आहेत.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी मानल्या गेलेल्या चेन्नई सुपर किंग्सची नजर आता आपल्या सहाव्या जेतेपदावर असणार आहे. सध्या चेन्नई आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांच्या नावावर प्रत्येकी 5-5 आयपीएल ट्रॉफी आहेत. सीएसकेने आपले शेवटचे विजेतेपद 2023 मध्ये जिंकले होते. अशा स्थितीत, कोचिंग स्टाफमध्ये झालेल्या या महत्त्वपूर्ण बदलांनंतर संघ आगामी हंगामात कशी कामगिरी करतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

गॅरेथ बॅटी यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द लांब राहिली असली, तरी ते इंग्लंडसाठी मोजकेच सामने खेळले. बॅटीने 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 2016 मध्ये शेवटचा सामना खेळला. आपल्या 14 वर्षांच्या कारकिर्दीत बॅटीने 9 कसोटी, 10 एकदिवसीय आणि 1 टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला असून, कसोटीत 15 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 5 विकेट्स घेतल्या आहेत.

Comments are closed.