समुद्रात तरंगते होर्डिंग्ज लावण्याचा निर्णय तातडीने मागे घ्या; मुंबईचे सौंदर्य विद्रूप करण्याच्या निर्णयाला आदित्य ठाकरे यांचा तीव्र विरोध

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी समुद्रात तरंगते हार्ंडग्ज लावण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. मुंबईचे नैसर्गिक सौंदर्य विद्रूप करणाऱया या निर्णयाला शिवसेनेचा तीव्र विरोध असून हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून याप्रश्नी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. मुंबईतील प्रदूषण सतत वाढत आहे. त्यावर कोणतीही ठोस कारवाई सरकार करत नसल्यामुळे किनारपट्टीपासून थोडय़ा अंतरावरूनही समुद्र व्यवस्थित दिसत नाही. त्यातच हार्ंडग्ज पंत्राटदारांच्या टोळीला पाठिंबा देण्याचा हा अवाजवी निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे जे काही थोडेफार समुद्राचे चित्तवेधक दृश्य उरले आहे तिथेही आता नागरिकांना फक्त जाहिरातीच दिसतील. मुंबईकर आधीच जमिनीवरील बेसुमार प्रदूषण सहन करत असून त्यात समुद्रात हार्ंडग्ज लावण्याचा निर्णय म्हणजे आणखी एक अन्याय आहे, असे आदित्य ठाकरे यांनी या पत्रात नमूद केले आहे.

रात्रीच्या वेळी नागरिकांना त्रासदायक ठरणाऱया एलईडी हार्ंडग्जवर नियंत्रण ठेवणारे आणि मुंबईत हार्ंडग्जच्या संख्येवर मर्यादा घालणारे एक निश्चित धोरण असायला हवे. पंत्राटदारांच्या आर्थिक हितापेक्षा शहराचे सौंदर्य आणि नैसर्गिकता जपण्याला प्राधान्य देणे हाच नियम असायला हवा, असे आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी समुद्रात हार्ंडग्ज लावण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करावा आणि संभाव्य भ्रष्टाचाराचा संशय असलेला हा निर्णय तातडीने थांबवावा, असा आग्रह आदित्य ठाकरे यांनी धरला आहे.

Comments are closed.