जान्हवी कपूर कधी घेणार सात फेरे? अभिनेत्रीने केला लग्नाबाबत खुलासा – Tezzbuzz

बाॅलीवुड कलाकार जान्हवी कपुर ही नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. आणि ती आता नुकतीच लोकप्रिय शो ‘कॉफी विथ करण’ या मध्ये वरुण धवन सोबत दिसली होती. 28 ऑक्टोबर रोजी प्रसारीत झालेल्या या भागात अर्जुन कपुरही विशेष पाहुणा म्हणुन आला होता. या दरम्यान सर्वानी त्याच्या नात्याबाबात  आणि लग्नाविषयी गप्पागोष्टी केल्या, त्यावेळी जान्हवी कपुरने तिच्या लग्नाच्या योजनेबाबत उत्तर दिले.

ती म्हणाली की, सध्या लग्न करण्याची तिची कोणतीही योजना नाही. माझ्या अनेक चाहत्यांनी प्रश्न पडला असेल पण  त्यासाठी त्यांना आणखी काही वर्षे थांबावे लागेल. तसेच जान्हवीने तिच्या जवळच्या मित्रांच्या नात्यांबद्दल आणि ते कठीण काळात एकमेकांना कसे साथ देतात याबद्दलही मनमोकळेपणाने सांगितले.

करण (karan)जोहर त्याच्या शोमध्ये पाहुण्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत विचारतो. त्यामुळे त्याच्या शो बाबत चर्चा आणि या शो अनेक चाहते आहेत.  जान्हवी कपूरसोबतच्या संभाषणादरम्यान, त्याने अभिनेत्रीच्या लग्नाच्या योजनांबद्दलही विचारण्याचा प्रयत्न केला. जेव्हा करणने तिला विचारले की ती लग्न कधी करणार आहे, तेव्हा जान्हवीने कोणताही संकोच न बाळगता उत्तर दिले की पुढील दोन ते तीन वर्षांत लग्नाची शक्यता नाही.

जान्हवी कपूरचे नाव बऱ्याच काळापासून शिखर पहारियासोबत जोडले जात आहे. हे दोघे अनेक प्रसंगी एकत्र दिसले आहेत आणि त्यांचे नाते नेहमीच चर्चेचा विषय ठरते. तर या दरम्यान शोमधील संभाषणादरम्यान, करण जोहरने जान्हवीच्या आसपास झालेल्या काही ब्रेकअपकचाही उल्लेख केला.  मात्र जान्हवी स्पष्ट केले आहे, की अजुन 2 ते 3 वर्षे ती लग्न करणार नाही.

हेही वाचा
या चित्रपटात साई पल्लवी साकारणार ips अधिकारी, अन् पार पाडणार एक मोठ ऑपरेशन

Comments are closed.