समुद्रावर भारताचा प्रभाव वाढला आहे
नवी दिल्ली
भारतीय नौदलाने आपल्या स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतवर राफेल मरीन (राफेल-एम) लढाऊ विमान पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरित्या उतरवून भारताची सागरी शक्ती एका नव्या स्तरावर पोहोचल्याचे सिद्ध केले आहे. हे यश नौदल वैमानिकांचे अतुलनीय कौशल्य दर्शवते. आयएनएस विक्रांत आणि राफेल मरीन यांची ही जोडी आता समुद्रावर केवळ भारताचीच ताकद दाखवली जाईल याची हमी आहे. भारतीय नौदलाने याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चाचणीचे वैशिष्ट्या म्हणजे ‘राफेल-एम’ विमानाने आपल्या पहिल्याच प्रयत्नात विमानवाहू जहाजाच्या मर्यादित फ्लाइट डेकवर यशस्वी लँडिंग केले.
राफेल मरीन लढाऊ विमानाने 29 ऑक्टोबर रोजी आयएनएस विक्रांतवर यशस्वी लँडिंग केले. आयएनएस विक्रांत हे भारतीय नौदलाचे स्वदेशी विमानवाहू जहाज आहे. हे लँडिंग नौदलात या विमानाचा वापर करण्याच्या दिशेने एक प्राथमिक पाऊल मानले जात आहे. हे लँडिंग एका फ्रेंच वैमानिकाने केले असून ही चाचणी पहिल्या उ•ाण मोहिमेचा एक भाग होती. भारतीय विमानवाहू जहाजावर फ्रेंच जेटच्या सुसंगततेची चाचणी म्हणून या मोहिमेकडे पाहिले जात आहे. या यशस्वी चाचणीमुळे, राफेल मरीन लढाऊ विमानांना भारतीय नौदलात सामील करून त्यांना मोहिमेसाठी सज्ज करण्याच्या प्रक्रियेने एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले आहे.
भारतीय नौदलाच्या म्हणण्यानुसार, राफेल मरीनच्या म्हणजेच ‘राफेल-एम’च्या आयएनएस विक्रांतवरील यशस्वी लँडिंगनंतर चाचण्या सुरू झाल्या आहेत. या चाचण्यांमुळे राफेल मरीन विमानाला भारतीय नौदलात कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू होईल. दुसरी उ•ाण मोहीम 2027 च्या सुरुवातीला होणार आहे. दुसऱ्या चाचणीनंतर भारतीय वैमानिक फ्रान्समध्ये प्रशिक्षण घेतील. सध्या, विक्रांतवर मिग-29के कार्यरत आहे. 2028 नंतर राफेल-एमच्या आगमनाने नौदलाची हल्ला करण्याची क्षमता अनेक पटींनी वाढेल.
‘राफेल-एम’ चाचणीची वैशिष्ट्यापूर्णता…
डिझाइनमधील फरक : ‘राफेल-एम’ हे मूलत: फ्रान्सच्या चार्ल्स डी गॉल विमानवाहू जहाजासाठी डिझाइन केले असून ते कॅटोबार (कॅटापल्ट टेक-ऑफ) वापरते, तर आयएनएस विक्रांत आणि विक्रमादित्य हे स्टोबार (स्की जंप रॅम्प टेक-ऑफ) वापरतात. ‘राफेल-एम’ भारतीय रॅम्पवरून उ•ाण करू शकते का आणि अरेस्टर वायरने थांबवले जाऊ शकते का, हे ठरवण्यासाठी चाचणी केली जात आहे.
गोव्यातील सज्जता : या आठवड्याच्या सुरुवातीला, गोव्यातील आयएनएस हान्सा येथील शोर बेस्ड टेस्ट फॅसिलिटीमध्ये (एसबीटीएफ) चाचण्या सुरू होत्या. तेथे विक्रांतसारखाच एक स्की जंप रॅम्प बांधण्यात आला आहे.
26 ‘राफेल-एम’ करार : भारताने 28 एप्रिल 2025 रोजी फ्रान्ससोबत अंदाजे 63,000 कोटी रुपये (7.5 बिलियन डॉलर) किमतीच्या 26 ‘राफेल-एम’ विमानांसाठी करार केला. यामध्ये 22 सिंगल-सीट लढाऊ विमाने आणि चार ट्विन-सीट प्रशिक्षण विमानांचा समावेश आहे. 2028 च्या अखेरीस किंवा 2029 च्या सुरुवातीला वितरणास सुरुवात होण्याचे नियोजित आहे.
Comments are closed.