संजय राऊत यांच्या ‘बोध कीर्तन’चे दिमाखदार प्रकाशन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिवसेना नेते-खासदार, दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या बहुचर्चित ‘बोध कीर्तन’ पुस्तकाचे प्रकाशन आज एका दिमाखदार सोहळ्यात झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे व ज्येष्ठ पत्रकार-लेखक अंबरीश मिश्र यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. विचार, सुविचार, काव्य, पत्र, भावना आणि मनातील उद्रेकाचे प्रतिबिंब असलेल्या या आगळ्यावेगळ्या पुस्तकाचे सर्वांनीच भरभरून कौतुक केले. संजय राऊत यांनी यापुढेही लिहीत राहून अनेक पुस्तके निर्माण करावीत, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेही यावेळी उपस्थित होते. दादरच्या ब्राह्मण सहाय्यक संघात झालेल्या या सोहळ्याला वाचनप्रेमींनी तुडुंब गर्दी केली होती.

Comments are closed.