आगामी ‘रामायण’ चित्रपटाचे अनधिकृत स्ट्रिमिंग थांबवा!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

'रामायण' चित्रपटाच्या कॉपी राईट्सचे हक्क असलेल्या गॉड पावर मीडिया प्रायव्हेट लिमिटेडला मुंबई हायकोर्टाने तूर्तास दिलासा दिला आहे. रामायण चित्रपटाचे रेकार्ंडग, होस्टिंग किंवा स्ट्रिमिंग करण्यापासून अज्ञात ‘जॉन डो’ संस्था आणि डिजिटल प्लॅटफॉर्मना रोखणारा अंतरिम मनाई आदेश हायकोर्टाने जारी केला आहे. रामायण चित्रपट 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून गॉडपॉवर लिमिटेडकडे चित्रपटाचे देशांतर्गत आणि विविध भौगोलिक क्षेत्रांतील बौद्धिक संपदा हक्क तसेच व्यावसायिक वापराचे अधिकार आहेत. कॉपीराइट उल्लंघनाच्या भीतीने कंपनीने हायकोर्टात धाव घेत जॉन डो व अन्य विरोधात दावा दाखल केला होता. या याचिकेवर न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठाकडे सुनावणी झाली. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, चित्रपटाचे किंवा त्यातील काही भागांचे चित्रीकरण करून ते विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्याची वादी कंपनीची भीती प्रथमदर्शनी वास्तविक आणि ठोस आहे.

Comments are closed.