ट्रेंड – चिमुकल्यांनी वेधले लक्ष
एका गाण्यावर लहान मुलांनी केलेल्या नाचाचा व्हिडीओ मोठय़ा प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुले शाळेमध्ये उत्साहात नाचत आहेत. असे वाटतेय की, मुले शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी नाचाचा सराव करत आहेत. ‘ओ हो हो हो इशक तेरा’ या सुप्रसिद्ध गाण्यावर आपल्याच धुंदीत मुले ताल धरून नाचत आहेत. हा व्हिडीओ @bobby.dancer_original यांनी आपल्या इन्स्टा आयडीवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला 1.6 दशलक्षाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओमधील लहानग्यावर नेटिझन्स प्रेमाचा वर्षाव करत असून ‘पुढचा छोटा मुलगा कमालीचा छान नाचतोय’, ‘खूपच गोंडस’ अशा कमेंट्स येत आहेत.
Comments are closed.