आनंदीबाई काळे विद्यालय प्लेट गटात चॅम्पियन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हॅरिस शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या प्लेट गटात आनंदीबाई दामोदर काळे विद्यालयाने विजेतेपदावर दिमाखात शिक्कामोर्तब केले. अंतिम सामन्यात काळे विद्यालयाने नवी मुंबई विद्यालयाचा चार विकेट्स राखून पराभव केला

ओव्हलवरील सचिवालय जिमखाना ग्राउंडवर झालेल्या लढतीत काळे विद्यालयाच्या रिक्षेश तिवारी आणि अवधूत राऊळ यांनी प्रत्येकी तीन विकेट घेत नवी मुंबईच्या फलंदाजीला खिंडार पाडले. त्यामुळे नवी मुंबईचा डाव 31.2 षटकांत 108 धावांत आटोपला. रिक्षेशने 14, तर अवधूतने 15 धावा देत प्रत्येकी तीन विकेट्स
मिळवल्या.

प्रत्युत्तरादाखल काळे विद्यालयाने 20.3 षटकांत सहा विकेट्सच्या मोबदल्यात 109 धावा करत विजय साकारला. अथर्व नाईकने 43, तर मनजीत दळवीने 37 धावांची आक्रमक खेळी करत विजयात मोलाचा वाटा उचलला. भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर काळे विद्यालयाने प्लेट गटाचे जेतेपद पटकावले.

Comments are closed.