होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय जहाजावर हल्ला; एक व्यक्ती मृत

जहाजावरील 14 भारतीयांपैकी 13 जणांची सुटका : हल्ले थांबवण्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे आवाहन

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

होर्मुझच्या सामुद्रधुनीत 2 नोव्हेंबर रोजी भारतीय जहाजावर झालेल्या हल्ल्यात गुजरातमधील एका खलाशाचा मृत्यू झाला. जहाजावरील अन्य 13 भारतीयांना ओमानच्या तटरक्षक दलाने सुरक्षित वाचवले. मृत नाविकाची ओळख गांधार नाहीम अजीज अशी झाली असून, जहाजाचे नाव ‘एमएसव्ही अल जुसुफी’ आहे.

हल्ल्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने व्यापारी जहाजांना लक्ष्य केले जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. व्यापारी जहाजांवरील हल्ले तातडीने थांबवावेत आणि आंतरराष्ट्रीय समुद्री मार्गांवरील वाहतूक व व्यापार विनाअडथळा सुरू राहावा, असे आवाहन मंत्रालयाने केले.

याआधीही जहाजावर हल्ला

29 ऑक्टोबर रोजी भारतीय खलाशी असलेल्या ‘एमटी लुईस 1’ या तेलवाहू जहाजावरही हल्ला झाला होता. पनामा-ध्वजांकित या जहाजावर 27 भारतीय कर्मचारी होते. एका छोट्या नौकेतून आलेल्या व्यक्तींनी जहाजाच्या बाहेरील भागावर दोन स्फोटके लावून तेथून पलायन केले. काही वेळाने स्फोट झाल्याने इंजिन कक्षात आग लागली आणि इंजिन काही काळ बंद पडले. मात्र, कर्मचाऱ्यांनी आग आटोक्मयात आणली. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी जहाजावरील सर्व 27 भारतीय सुरक्षित असल्याचे सांगितले होते. या हल्ल्यामागे कोण होते, हे स्पष्ट झालेले नाही.

होर्मुझ परिसरात 122 जहाजांवर हल्ले

आंतरराष्ट्रीय समुद्री संघटनेच्या (आयएमओ) माहितीनुसार, 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका-इराण संघर्ष सुरू झाल्यापासून 30 ऑक्टोबरपर्यंत फारसची खाडी, होर्मुझची सामुद्रधुनी आणि ओमानच्या आखातात 122 जहाजांवर हल्ले झाले. होर्मुझ हा जागतिक तेलवाहतुकीसाठी महत्त्वाचा समुद्री मार्ग आहे. येथे सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे तेलपुरवठा आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम होण्याची शक्मयता आहे.

जयशंकर यांनीही मांडला मुद्दा

पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांचा मुद्दा परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी जी20 देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत उपस्थित केला होता. अशा हल्ल्यांचा फटका गरीब आणि विकसनशील देशांना अधिक बसू शकतो, असे त्यांनी म्हटले. इंधन, अन्नधान्य आणि खतांच्या पुरवठ्यावर परिणाम होऊन त्यांच्या किमती वाढण्याचीही शक्मयता त्यांनी व्यक्त केली.

Comments are closed.