वनडेत विराट कोहलीचा नवा विश्वविक्रम! 13 हजार धावांचा टप्पा गाठणारा जगातील पहिलाच फलंदाज

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात, भारतीय फलंदाज विराट कोहलीने आपली 12वी धाव पूर्ण करताच एक विशेष टप्पा गाठला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आधीच विराटच्या नावावर होता. आता त्याने या जागतिक विक्रमात आणखी एका ऐतिहासिक कामगिरीची भर घातली आहे. तो या क्रमांकावर फलंदाजी करताना 13000 धावांचा टप्पा ओलांडणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

काही महिन्यांपूर्वी, विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांना मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. 13000 धावांचा टप्पा ओलांडून त्याने हा विक्रम अधिक भक्कम केला आहे. विशेष म्हणजे, एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रमही विराटच्याच नावावर आहे.

वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारे फलंदाज (सरासरी)

13000 – विराट कोहली (61.61)
12662 – रिकी पाँटिंग (42.48)
९७४७ – कुमार संगकारा (४४.७१)
7774 – जॅक कॅलिस (45.72)
६५०४ – केन विल्यमसन (५१.६१)
6054 – बाबर आझम (55.54)
५५२५ – जो रूट (५३.१२)

ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांनी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 42.48 च्या सरासरीने 12662 धावा केल्या होत्या. मात्र, विराटने 60 पेक्षा जास्त सरासरी राखत त्यांना मागे टाकले आणि आता 61.61 च्या सरासरीसह 13000 धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.

प्रथम फलंदाजी करताना किवी संघाने सर्व गडी गमावून 185 धावा केल्या आहेत, टीम इंडियासमोर 186 धावांचे टार्गेट आहे. गोलंदाजीत भारतीय संघाकडून अर्शदीप सिंग सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

Comments are closed.