मोदींच्या मित्राला जनतेने तोंडावर पाडलं, २०२९ मध्ये हिंदुस्थानातही हेच घडेल; अमेरिकेच्या निकालावरून रोहित पवारांचा भाजपवर घणाघात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेतील निवडणुकांच्या निकालांचा संदर्भ देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचेआमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “एखादा सत्ताधारी स्वतःला लोकशाहीपेक्षा मोठा समजायला लागला की जनता त्याला धडा शिकवते,” अशा शब्दांत त्यांनी अमेरिकेच्या निकालांच्या अनुषंगाने भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

X वर एक पोस्ट करत रोहित पवार म्हणाले आहेत की, “एखादा सत्ताधारी स्वतःला लोकशाहीपेक्षा मोठा समजायला लागला की जनता त्याचा बाजार उठवते, हे आज आलेल्या अमेरिकन मध्यावधी निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. आपल्या हेकेखोर वागणुकीने संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या मोदीसाहेबांच्या मित्राला तिथल्या जनतेने तोंडावर पाडण्याचे काम केले. २०२९ मध्ये हिंदुस्थानातील जनतादेखील सध्याच्या सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही.”

ते म्हणाले की, “ज्याप्रमाणे ब्राझीलमध्ये कट्टर उजव्यांना जनतेने नाकारले, तसेच आज अमेरिकेत घडले आहे. पुढे २०२९ मध्ये हिंदुस्थानात देखील लोकशाहीची पताका अशीच बुलंद होईल, यात शंका नाही.”

Comments are closed.