मुंबई लोकल: ८ नोव्हेंबरला मेगा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द!
विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवार, 8 नोव्हेंबर 2026 रोजी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून मेन लाइन आणि हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान असेल. त्यामुळे मुंबईतील अनेक लोकल सेवेवर परिणाम होणार आहे, तर काही गाड्या जलद मार्गावर चालवण्यात येणार असून अनेक सेवा रद्द राहतील.
सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 पर्यंत मुख्य मार्गावर ब्लॉक
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सकाळी १०:१४ ते दुपारी ३:३२ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर धावतील. या गाड्या सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकावर थांबतील. मुलुंडनंतर त्या पुन्हा डाऊन स्लो मार्गावर चालवल्या जातील.
त्याचप्रमाणे सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ या वेळेत ठाण्याहून सुटणाऱ्या अप धीम्या लोकल मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर चालवल्या जातील. त्यांचा थांबा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन स्थानकावर असेल. माटुंग्यानंतर या गाड्या पुन्हा अप स्लो मार्गावर चालवल्या जातील.
जलद मार्गावर वळवलेल्या या लोकल गाड्यांना त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचण्यास सुमारे 15 मिनिटे उशीर होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यान सीएसएमटी येथे सुटणाऱ्या आणि येणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व अप आणि डाऊन लोकल देखील अंदाजे 15 मिनिटे उशिराने धावतील.
हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत ब्लॉक
हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तथापि, पोर्ट लाईन सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
हार्बर लाईन सेवा रद्द राहतील
पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर लोकल सकाळी १०:३३ ते दुपारी ३:४९ या वेळेत रद्द राहतील.
सीएसएमटीहून बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर लोकल सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत रद्द राहतील.
ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवांवरही परिणाम झाला
ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवांमध्येही बदल करण्यात आले आहेत.
पनवेलहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अप लोकल सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ पर्यंत रद्द राहतील.
ठाण्याहून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन लोकलही सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० या वेळेत रद्द राहतील.
प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था
मेगाब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. त्याचवेळी, ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. पोर्ट लाईनवरही गाड्या नेहमीप्रमाणे धावतील.
रेल्वे ट्रॅक, सिग्नलिंग यंत्रणा आणि इतर पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि प्रवाशांचा सुरक्षित रेल्वे प्रवास सुनिश्चित करण्यासाठी मेगा ब्लॉक आवश्यक असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. प्रवाशांनी रविवारी प्रवासाचे नियोजन करताना रेल्वे सेवेत केलेले बदल लक्षात ठेवावेत, असे आवाहन रेल्वेने केले आहे.
Comments are closed.