‘राधे माँ’चे आक्षेपार्ह व्हिडीओ हटवा, सर्व सोशल मीडियांना निर्देश

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

स्वयंघोषित अध्यात्म गुरू राधे माँ यांची बदनामी करणारे मजपूर व व्हिडीओ तत्काळ हटवा, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी गुगलसह अन्य सोशल मीडियांना दिले. बनावट व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित होत असल्याचा दावा राधे माँ यांनी केला आहे.

न्या. माधव जामदार यांच्या एकलपीठासमोर ही सुनावणी झाली. राधे माँ यांचे हिंदुस्थानासह जगभरात भक्त आहेत. कपाळावर विशिष्ट प्रकारचा लाल रंगाचा गंधक व हातात त्रिशुळ अशी राधे माँ यांची खास ओळख आहे. याचा वापर करून विचित्र प्रकारचे व्हिडीओ तयार केले जातात. काही व्हिडीओ तर बीभस्त आहेत. याने नाहक बदनामी होत आहे. तेव्हा हे व्हिडीओ काढून टाकण्याचे आदेश दिले जावेत, अशी मागणी वरिष्ठ वकील व्यंकटेश धोंड यांनी केली, ती न्यायालयाने मान्य केली.

सन्मानाने जगण्याचा अधिकार

राधे माँ यांचा पह्टो व आवाज वापरून चुकीचे व्हिडीओ तयार केले जात आहेत. त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ व अन्य मजपूर सोशल मीडियावरून हटवला जाईल याची काळजी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने घ्यावी, असेही न्यायालयाने नमूद केले.

Comments are closed.