भिडेवाडा स्मारकाचे काम मार्चपर्यंत पूर्ण होणार
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केलेल्या ऐतिहासिक भिडेवाडय़ात उभारण्यात येत असलेल्या सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहे.
भुजबळ यांनी शनिवारी भिडेवाडा येथे भेट देऊन स्मारकाच्या कामाची पाहणी केली. यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. स्मारकासाठी सुमारे 35 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून स्थापत्यविषयक बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. विद्युत व्यवस्था, ऑडिओ-व्हिडीओ सादरीकरण आणि होलोग्राफीची कामे सुरू आहेत. घुमटांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित दृश्राव्य सादरीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.
Comments are closed.