आयसीसीतही बिनविरोध पॅटर्न, जय शहा पुन्हा अध्यक्ष

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानात निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांनी बिनविरोध पॅटर्न चालवला असताना क्रिकेटच्या मैदानातही हा पॅटर्न पोहोचला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांची आज पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

न्यूझीलंडच्या ग्रेग बार्कले यांच्याकडून 2024 मध्ये जय शहा यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. आता सलग दुसऱ्यांदा त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यामुळे 2028 पर्यंत जय शहा हे आयसीसीच्या अध्यक्षपदावर कायम असतील.

Comments are closed.