आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अर्शदीप सिंगची मोठी झेप
न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील प्रभावी कामगिरीचे अर्शदीप सिंगला आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत बक्षीस मिळाले आहे. गोलंदाजांमध्ये त्याने तब्बल 12 स्थानांची झेप घेत संयुक्तपणे 19 वे स्थान पटकावले आहे. या आठवड्यात गोलंदाजीच्या क्रमवारीत सर्वाधिक प्रगती करणाऱया खेळाडूंमध्ये अर्शदीपचा समावेश आहे.
हिंदुस्थानचा कर्णधार शुभमन गिल एकदिवसीय सामन्यांमध्ये जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज म्हणून कायम आहे. हिंदुस्थानसाठी चौथ्या वन डे सामन्यात कर्दनकाळ ठरलेला न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीलाही आयसीसीच्या या क्रमवारीत चांगलाच फायदा झाला आहे. मॅचने 15 स्थानांची झेप घेत 12 वे स्थान पटकावले आहे,
Comments are closed.