रामायण चित्रपटाचा बॅाक्स ऑफिसवर धुमाकुळ, 14 दिवसांत कमाई 1500 कोटींच्या पार – Tezzbuzz
रणबीर कपुर अभिनीत रामायण हा चित्रपटा सध्या बाॅक्स ऑफिसवर उत्तम काम करत आहे. हा चित्रपट 5 नोव्हेंबरला झाला आहे. आणि या चित्रपटाने प्रदर्शित झाल्याच्या अवघ्या दोन आठवड्यांतच या चित्रपटाने उत्तम कमाई करत बाॅक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे, नितेश तिवारी दिग्दर्शित या पौराणिक चित्रपटाने भारतात १००० कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे. तर जगभरात 1500 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.
चित्रपटाने प्रदर्शनाच्या 14 व्या दिवशी पण कोट्यावधी रुपायांची कमाई सुरु ठेवली आहे. यावरुन बाॅक्स ऑफिसवरील पकड लक्षात येते. चित्रपटाचे एकूण देशांतर्गत निव्वळ कलेक्शन 837.49 कोटी पर्यंत पोहोचले आहे. दरम्यान, भारतातील त्याचे एकूण कलेक्शन 1000.62 कोटी नोंदवले गेले आहे. अशाप्रकारे, चित्रपटाने देशांतर्गत बाजारपेठेत 1000 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
नितेश (nitesh)तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा चित्रपट असुन 5 नोव्हेंबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. यात रणबीर कपूरने प्रभू रामाची, तर सई पल्लवीने सीतेची भूमिका साकारली आहे. यशने रावणाची भूमिका साकारली आहे. सनी देओलने हनुमानाची आणि अरुण गोविलने राजा दशरथाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. भव्य बजेट आणि नेत्रदीपक दृश्यांसह बनलेला हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दुसरा भाग 2027 मध्ये प्रदर्शित करण्याची योजना आहे. आणि त्यामुळे प्रेक्षक आता या दुसऱ्या भागासाठी प्रंचड उत्सुक आहेत.
हेही वाचा
रामायणने 13 व्या दिवशी भारतात 821.30 कोटींचा टप्पा पार करत, जगभरात इतक्या कोटींच्या केली वाटचाल
Comments are closed.