9,000 फूट उंचीवर असलेल्या जंगलात अनोखे फूल फुलले आहे.

अरुणाचल प्रदेशच्या दुर्गम पर्वतीय भागात समुद्रसपाटीपासून तब्बल 9,186 फूट उंचीवर फुलणाऱ्या वनस्पतीची एक नवीन प्रजाती संशोधकांना आढळली आहे. अत्यंत उंच आणि दुर्गम परिसरात या वनस्पतीचा शोध लागल्याने वनस्पतीशास्त्रज्ञांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

हिमालयीन प्रदेशातील जैवविविधता किती समृद्ध आहे, याची पुन्हा एकदा या शोधातून प्रचिती आली आहे. अऊणाचल प्रदेशातील जंगलांमध्ये आणि पर्वतीय भागांमध्ये आजही अनेक अज्ञात वनस्पती प्रजाती अस्तित्वात असण्याची शक्मयता या संशोधनामुळे अधोरेखित झाली आहे.

‘डिस्पोरोप्सिस क्रिस्पाटा’ असे प्रजातीचे नाव

या नव्या फुलझाडाला ‘डिस्पोरोप्सिस क्रिस्पाटा’ असे शास्त्रीय नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, भारतात ‘डिस्पोरोप्सिस’ या वनस्पती वंशाची नोंद प्रथमच झाली आहे. यापूर्वी या वंशातील वनस्पती म्यानमार, चीन, तैवान, फिलिपाइन्स आणि आग्नेय आशियातील काही भागांत आढळल्या होत्या. या शोधामुळे या वनस्पती वंशाचे भौगोलिक अस्तित्व भारतापर्यंत विस्तारले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारतीय वनस्पती विविधतेच्या अभ्यासात या शोधाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

पानांच्या वैशिष्ट्यापूर्ण रचनेमुळे मिळाली ओळख

डिस्पोरोप्सिस क्रिस्पाटा या वनस्पतीची पाने तिचे सर्वांत वेगळे वैशिष्ट्या आहे. या वनस्पतीच्या पानांच्या कडा सरळ नसून लहरी आणि सुरकुत्यांसारख्या दिसतात. याच वैशिष्ट्यावरून तिला ‘क्रिस्पाटा’ हे नाव देण्यात आले आहे. या वनस्पतीचे खोड लालसर रंगाचे असून त्याची उंची साधारण 30 ते 80 सेंटीमीटरपर्यंत असते. तिची पाने भाल्यासारख्या आकाराची असून त्यांची लांबी 5 ते 15 सेंटीमीटर असते. या वनस्पतीला पांढऱ्या आणि हिरव्या रंगांची फुले येतात. तसेच तिच्यावर  पांढरी फळे येतात. प्रत्येक फळामध्ये साधारण तीन ते आठ बिया असतात. या वैशिष्ट्यापूर्ण रचनेमुळे संशोधकांना या वनस्पतीची स्वतंत्र प्रजाती म्हणून ओळख पटवता आली.

2026 मधील मोहिमेत लागला शोध

जून 2026 मध्ये वनस्पती संशोधक विनय कुमार साहनी यांनी अऊणाचल प्रदेशातील विजयनगर परिसरात वनस्पतींच्या अभ्यासासाठी मोहीम राबवली होती. याच मोहिमेदरम्यान या वनस्पतीचे फुलांसह नमुने गोळा करण्यात आले. त्यानंतर त्यांचा सखोल अभ्यास करण्यात आला. या संशोधनात आरोन फ्लोडेन, विनय कुमार साहनी, केट ई. आर्मस्ट्राँग, कॉलिन पेंड्री आणि कृष्णा चौलू या संशोधकांचा सहभाग होता. या संशोधकांचा संबंध विविध आंतरराष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्थांशी आहे.

1962 मध्येही मिळाला होता वनस्पतीचा नमुना

या शोधातील आणखी एक रंजक बाब म्हणजे, 1962 मध्ये म्यानमारमधील काचिन टेकड्यांमध्ये अशाच वनस्पतीचा एक नमुना गोळा करण्यात आला होता. मात्र, त्या वेळी त्याला फुले नसल्यामुळे त्याची अचूक ओळख पटू शकली नव्हती. सुऊवातीला हा नमुना ‘पॉलिगोनॅटम’ या वनस्पती वंशातील असल्याचा समज झाला होता. आता अऊणाचल प्रदेशात फुलांसह नमुने उपलब्ध झाल्यानंतर संशोधकांना त्याची स्वतंत्र प्रजाती म्हणून ओळख निश्चित करता आली. म्हणजेच, तब्बल सहा दशकांपूर्वी आढळलेल्या वनस्पतीचे गूढ आता उलगडले आहे.

एका ठिकाणी आढळल्या पाचपेक्षाही कमी वनस्पती

या नव्या प्रजातीच्या शोधासोबतच तिच्या संवर्धनाचा प्रश्नही महत्त्वाचा ठरत आहे. संशोधनादरम्यान भारतातील या वनस्पतीची केवळ एकच ज्ञात संख्या असलेली वस्ती आढळली असून, त्यामध्ये पाचपेक्षाही कमी वनस्पती असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे. त्यामुळे या प्रजातीच्या अस्तित्वाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या उपलब्ध माहिती अपुरी असल्याने आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेच्या निकषांनुसार तिला ‘डेटा डेफिशिएंट’ या श्रेणीत ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. म्यानमारमध्ये या वनस्पतीचा आणखी एक ऐतिहासिक नमुना सापडला होता. अऊणाचल प्रदेश, म्यानमार आणि चीनच्या युनान प्रांताला जोडणाऱ्या पर्वतीय परिसरात या वनस्पतीचा अधिवास आणखी असण्याची शक्मयता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

मे आणि जून महिन्यात येतात फुले

ही वनस्पती प्रामुख्याने रोडोडेंड्रॉन आणि बांबूच्या मिश्र्र वनस्पतींनी व्यापलेल्या समशीतोष्ण जंगलांतील ओलसर उतारांवर वाढते. साधारण मे आणि जून महिन्यांत तिला फुले येतात, तर जुलै ते डिसेंबर या कालावधीत फळे येतात. या शोधात विजयनगर परिसरातील स्थानिक याबिन आणि गोरखा समुदायांनी संशोधकांना मदत केली. स्थानिक लोकांचे ज्ञान आणि सहकार्य दुर्गम जंगलांतील वनस्पतींचा शोध घेण्यासाठी महत्त्वाचे ठरले. अऊणाचल प्रदेशातील ही पर्वतरांग पूर्व हिमालय, इंडो-बर्मा आणि नैऋत्य चीनमधील पर्वतीय जैवविविधता क्षेत्रांच्या संगमाजवळ आहे. त्यामुळे या परिसरात भविष्यातही अनेक अज्ञात वनस्पती प्रजातींचे शोध लागण्याची शक्मयता आहे.

Comments are closed.