कॅनडाच्या बाजारपेठेत भारताचा प्रभाव वाढणार आहे

50 अब्ज डॉलर्सच्या व्यापाराचे लक्ष्य : दोन्ही देशांमध्ये लवकरच मोठा करार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारत आणि पॅनडा यांच्यातील संबंध पुन्हा सुधारताना दिसत आहेत. दोन्ही देशांमधील अनेक दिवसांपासून रखडलेल्या व्यापार कराराच्या चर्चेला आता वेग आला आहे. प्रस्तावित व्यापक आर्थिक भागीदारी करार (सीईपीए) अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत करारासंदर्भातील चर्चा पूर्ण करण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न आहे. भारत आणि पॅनडा यांच्यात या करारावर दररोज चर्चा सुरू असून, दोन्ही देश अंतिम सहमतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

भारत आणि पॅनडाच्या अधिकाऱ्यांमध्ये 11 ते 20 नोव्हेंबरदरम्यान चर्चेची सहावी फेरी पार पडली. यामध्ये वस्तूंची आयात-निर्यात, सेवा क्षेत्रातील व्यापार, गुंतवणूक, बौद्धिक संपदा अधिकार, व्यापार नियम आणि आयात-निर्यातीशी संबंधित वाद अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि गुंतवणुकीला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.

प्रगतीचा आढावा

भारताचे वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी पॅनडाचे आंतरराष्ट्रीय व्यापार उपमंत्री ग्लेन प्यूर्विस आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळासोबत बैठक घेतली. या बैठकीत आतापर्यंत झालेल्या चर्चेचा आणि कराराच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. सातत्याने होत असलेल्या बैठकांमुळे दोन्ही देश हा करार लवकरात लवकर अंतिम करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट होत आहे.

चर्चा आता पुन्हा प्रयत्न सुरू

भारत आणि पॅनडा यांच्यात यापूर्वीही व्यापार कराराबाबत चर्चा झाली होती. मात्र, 2023 मध्ये पॅनडाने ही चर्चा थांबवली होती. त्यानंतर जागतिक व्यापार परिस्थितीत मोठे बदल झाले. पुरवठा साखळी मजबूत करणे आणि नवीन व्यापारी भागीदार शोधणे यांचे महत्त्व वाढले. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी यावषी पुन्हा चर्चा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मार्चमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी या कराराच्या चर्चेला औपचारिक सुऊवात केली होती.

2030 पर्यंत 50 अब्ज डॉलरच्या व्यापाराचे लक्ष्य

भारत आणि पॅनडा यांनी 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 50 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, सध्याची व्यापाराची आकडेवारी या लक्ष्यापासून बरीच दूर आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये दोन्ही देशांमधील व्यापार 8.23 टक्क्मयांनी घसरून 7.95 अब्ज डॉलरवर आला. 2024-25 मध्ये हा व्यापार 8.66 अब्ज डॉलर होता. यामध्ये भारताने पॅनडाला 4.67 अब्ज डॉलरच्या वस्तूंची निर्यात केली, तर पॅनडाकडून 3.28 अब्ज डॉलरच्या वस्तू आयात केल्या. त्यामुळे भारताला 1.38 अब्ज डॉलरचा व्यापार अधिशेष मिळाला.

भारतासाठी पॅनडा महत्त्वाची बाजारपेठ का?

सुमारे 4.16 कोटी लोकसंख्या आणि 2.34 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असलेला पॅनडा भारतीय उद्योजकांसाठी मोठी बाजारपेठ आहे. पॅनडामध्ये 4.25 लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच तेथे भारतीय समुदायाचीही मोठी उपस्थिती आहे. भारताकडून पॅनडाला औषधे, यंत्रांचे सुटे भाग, इलेक्ट्रॉनिक वस्तू, लोखंड-पोलाद, कपडे, रत्ने-दागिने, सागरी उत्पादने आणि ऑटोमोबाइलचे सुटे भाग निर्यात केले जातात. दुसरीकडे, पॅनडाकडून भारतात डाळी, खते विशेषत: पोटॅश, खनिज इंधन, लाकडाचा लगदा, हिरे, यंत्रसामग्री आणि विमानांचे सुटे भाग आयात केले जातात.

सेवा क्षेत्रातील व्यापारही महत्त्वाचा

भारत आणि पॅनडा यांच्यात केवळ वस्तूंचाच नव्हे, तर सेवा क्षेत्राचाही मोठ्या प्रमाणावर व्यापार होतो. भारताकडून पॅनडाला आयटी, दूरसंचार, संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित सेवा तसेच व्यावसायिक सेवा पुरवल्या जातात. 2025 मध्ये दोन्ही देशांमधील सेवा क्षेत्रातील एकूण व्यापार सुमारे 14 अब्ज डॉलर होता. यामध्ये भारताने सुमारे 3.2 अब्ज डॉलरच्या सेवांची निर्यात केली, तर जवळपास 11 अब्ज डॉलरच्या सेवांची आयात केली.

गुंतवणुकीसाठी स्वतंत्र कराराची तयारी

व्यापार करारासोबतच गुंतवणुकीचे संरक्षण करण्यासाठी दोन्ही देश स्वतंत्र द्विपक्षीय गुंतवणूक संरक्षण करारावरही चर्चा करत आहेत. एप्रिल 2000 ते जून 2026 या कालावधीत पॅनडाने भारतात 4.8 अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक केली आहे. भारतातील परकीय गुंतवणूकदारांमध्ये पॅनडाचा 16 वा क्रमांक आहे. सध्या भारतात 600 हून अधिक पॅनडाच्या कंपन्या कार्यरत आहेत, तर आणखी 1,000 पेक्षा जास्त कंपन्या भारतीय बाजारपेठेत व्यवसाय विस्ताराच्या संधी शोधत आहेत. त्यामुळे प्रस्तावित व्यापार करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

Comments are closed.