संयुक्त अरब अमिरातीत बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; अपघातात 13 जण ठार, मृतांमध्ये हिंदुस्थानी नागरिकांचा समावेश
संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) रास अल खैमाह येथे बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात हिंदुस्थानी नागरिकांसह 13 जणांचा मृत्यू झाला असून अन्य 14 जण जखमी झाले आहेत. दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाने ही माहिती दिली. मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असून त्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी स्थानिक प्रशासनासोबत काम करत आहेत.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, या अपघातात नेमके किती हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला किंवा जखमी झाले आहेत याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. UAE च्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रास अल खैमाह येथील अल वतन रोडवर हा अपघात घडला. अपघातात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये 41 प्रवासी होते. तांत्रिक बिघाडामुळे बस अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. अपघात प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
Comments are closed.