पंजाब नव्हे तर राजस्थान रॉयल्सचा होणार होता हार्दिक पांड्या! मुंबईच्या 'या' अटीमुळे शेवटच्या क्षणी डील रद्द!
आगामी आयपीएल हंगामापूर्वी, मुंबई इंडियन्सने त्यांचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला पंजाब किंग्सकडे ट्रेड केले आहे. हार्दिकच्या बदल्यात मुंबईने भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला आपल्या संघात सामील करून घेतले आहे. या हंगामातील सर्वात मोठ्या ट्रेडपैकी एक मानला जात आहे. मात्र, पंजाब किंग्सव्यतिरिक्त राजस्थान रॉयल्सनेही हार्दिकला आपल्या संघात घेण्याचा प्रयत्न केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्सने घातलेल्या एका विशिष्ट अटीमुळे राजस्थानसोबतचा करार ऐनवेळी फिसकटला.
आयपीएलचे पहिले विजेते, राजस्थान रॉयल्स, हार्दिक पांड्याला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक होते. राजस्थान रॉयल्सचे ‘डिरेक्टर ऑफ क्रिकेट’ कुमार संगकारा, हा करार अंतिम करण्यासाठी स्वतः बेंगळुरूला पोहोचले होते.
मात्र, मुंबई इंडियन्सने राजस्थानसमोर एक अट ठेवली: हार्दिकच्या बदल्यात त्यांना यशस्वी जयस्वाल आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर या दोघांचाही समावेश हवा होता. मुंबईने स्पष्ट केले की, जोपर्यंत जोफ्रा आर्चर या कराराचा भाग होत नाही, तोपर्यंत ते हार्दिकला राजस्थानकडे पाठवणार नाहीत. राजस्थान रॉयल्सने ही अट मान्य केली नाही. परिणामी, हा करार ऐनवेळी फिसकटला आणि अखेरीस हार्दिक पांड्या पंजाब किंग्समध्ये सामील झाला.
पंजाब किंग्समध्ये सामील झाल्यानंतर हार्दिक पांड्याच्या मानधनातही वाढ झाली आहे. मुंबई इंडियन्समध्ये गेल्या दोन वर्षांत त्याला प्रति हंगाम 16.35 कोटी रुपये मिळत होते, तर आता 2027 च्या आयपीएल हंगामासाठी त्याला पंजाब किंग्सकडून 18 कोटी रुपये मिळतील म्हणजेच त्याच्या मानधनात 1.65 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्सने अर्शदीप सिंगला ‘राईट टू मॅच’ (RTM) कार्ड वापरून 18 कोटी रुपयांत रिटेन केले होते. आता, मुंबई इंडियन्सकडूनही त्याला तितकीच, म्हणजेच 18 कोटी रुपयांची रक्कम मिळणार आहे.
या ट्रेडच्या माध्यमातून, मुंबई इंडियन्सने अर्शदीप सिंगच्या रूपाने एक अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज मिळवला आहे, जो आता जसप्रीत बुमराहसोबत गोलंदाजी करेल. यामुळे आगामी आयपीएल हंगामासाठी मुंबईची वेगवान गोलंदाजीची ताकद अधिक बळकट होईल.
Comments are closed.