NZ vs IND: सिराज बाहेर, 26 वर्षीय खेळाडूचे पदार्पण! दुसऱ्या कसोटीसाठी मोठा बदल? भारतीय प्रशिक्षकांनी दिली हिंट

न्यूझीलंड विरुद्ध भारत दुसरा कसोटी सामना २७ नोव्हेंबरपासून क्राईस्टचर्च येथे खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी मोहम्मद सिराजला पुन्हा एकदा वगळले जाणार, अशी माहिती समोर येत आहे. त्यामागचे कारण भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनी पत्रकार परिषदेत केलेले वक्तव्य.

दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मॉर्केल यांनी गुरनूर ब्रार याचे कौतुक केले. त्यांच्या मते, ब्रारकडे न्यूझीलंडच्या खेळपट्टीवर एक घातक गोलंदाज बनण्यासाठी आवश्यक असलेला वेग आणि उसळी आहे. त्यांच्या या मतामुळे दुसऱ्या कसोटीत ब्रारला संधी मिळण्याची शक्यता दिसते.

गुरनूर ब्रार संधी मिळण्याच्या उंबरठ्यावर आहे; तो सर्व योग्य गोष्टी करत आहे. त्याच्याकडे वेग आणि उसळी (बाऊन्स) आहे, ज्यामुळे तो या परिस्थितीसाठी अगदी योग्य ठरेल. एक प्रशिक्षक म्हणून माझे काम त्याला अशा प्रकारे तयार ठेवणे हे आहे की, जेव्हा कधी त्याला संधी मिळेल, तेव्हा तो पूर्णपणे सज्ज असेल, असे मॉर्केल यांनी म्हटले आहे.

क्राईस्टचर्चमधील हॅगली ओव्हल मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. येथे भारताने केवळ एकच कसोटी सामना खेळला आहे. तसेच येथे न्यूझीलंडची कामगिरीही फारशी चांगली नाही. त्यांनी येथे खेळलेल्या आपल्या शेवटच्या पाच कसोटी सामन्यांपैकी केवळ एकामध्येच विजय मिळवला आहे.

भारताने पहिल्या कसोटीत जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, अंशुल कंबोज आणि आकाश दीप या चार वेगवान गोलंदाजांना खेळवले होते. त्या सामन्यात भारताने पहिल्या डावात ७२० धावांचा डोंगर उभारला होता आणि ३५२ धावांची आघाडी घेतली होती, मात्र न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाज विकेट्स घेण्यात अपयशी ठरले. खेळपट्टी निर्जीव दिसत असल्याने भारताचा कर्णधार शुभमन गिलने विरोधी संघाच्या फलंदाजांशी हस्तांदोलन केले आणि सामना अनिर्णीत राहिला.

ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशीप २०२५-२७ चा भाग आहे. पहिला सामना अनिर्णीत राहिल्याने या स्पर्धेच्या गुणतालिकेत दोन्ही संघांना मोठे नुकसान झाले. त्यांच्या टक्केवारीमध्ये घसरण झाली. त्यामुळे दुसरा सामना जिंकत स्पर्धेत आपले आव्हान कायम राखायचे आणि मालिका जिंकण्याचे दोन्ही संघांचे प्रयत्न असणार आहे. यामुळ भारताचे अंतिम अकरा खेळाडू कोण असतील, याकडे सध्या चाहत्यांचे लक्ष आहे.

Comments are closed.